Episodes

  • # 1995 : भक्ती ची शक्ती (ॲड.स्वाती लेले)
    Mar 21 2026

    Send us Fan Mail

    अयोध्येत दररोज एक तास रामकथा रंगायची.
    त्या दरबाराची सुरुवात एका अनोख्या आमंत्रणाने व्हायची
    “या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा…”

    त्या काळात ही केवळ परंपरा नव्हती,
    ती होती अढळ श्रद्धेची जिवंत अनुभूती.

    त्या दरबारात एक विद्वान वकीलही नियमित येत असे.
    भक्तिभावाने तो कथा ऐकत असे, पण त्याची बुद्धी तर्काला सरावलेली होती.

    एक दिवस मनात प्रश्न उभा राहिला,
    “खरंच येतात का हनुमंतजी?”

    प्रश्न विचारला गेला…
    विश्वासाला आव्हान दिलं गेलं…....!

    Show more Show less
    7 mins
  • # 1994 : "एक फोन कॉल" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Mar 20 2026

    Send us Fan Mail

    “आजोबा, तुम्ही रोज स्वतःच्याच नंबरवर फोन का करता?”

    “तुझी आजी जिवंत होती ना… ती मला रोज याच वेळी फोन करायची."

    दुसऱ्या दिवशी, अगदी त्याच वेळी,

    त्यांना जगातला सगळ्यात गोड आवाज ऐकू आला

    “हाय आजोबा… फक्त एवढं सांगायचं होतं, की या वेळी अजूनही कुणीतरी तुमची आठवण काढतंय.”

    Show more Show less
    1 min
  • # 1993 : बोहोनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Mar 17 2026

    Send a text

    अनेक वर्षापासून दारावर एक ड्रेस मटेरियल, बेडशिट असे कापड प्रकार विकायला मुलगा येतो. तो सुरतेहून कापडं आणतो.
    त्याने आणलेल्या सामानावरून मी एक नजर टाकते. एक- एक प्रिंटही फार सुंदर असायची.
    त्यातल्या त्यात वेधक वेचक असं काही असेल तर केवढ्याला आहे! अमूक अमूक उघडून दाखव वगैरे संवाद सुरू होतो.
    त्याचा माझा सौदा पटला तरच ती वस्तू घरात येते.
    बरेचदा आमच्या दोघां मधला सौदा तुटतो/ फिसकटतो. मग मी सरळ नकार देऊन दरवाजा लावू का विचारून दार बंद करते.

    Show more Show less
    5 mins
  • # 1992 : ड्यु प्रोसेस ॲंड राईट टु कौंसेल. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Mar 14 2026

    Send a text

    जेव्हा खटला सुरू झाला, तेव्हा गिडियनने न्यायालयाकडे एक साधी, घटनात्मक मागणी केली:
    "महाराज, माझी अशी विनंती आहे की, या खटल्यात माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला एक वकील दिला जावा."
    ​जजचे उत्तर सभ्य होते, पण भयंकर होते:
    "मिस्टर गिडियन, मला क्षमा करा, पण मी तुम्हाला वकील देऊ शकत नाही. फ्लोरिडा राज्याच्या कायद्यानुसार, न्यायालय फक्त तेव्हाच वकील नियुक्त करू शकते जेव्हा आरोपीवर मृत्युदंडाच्या शिक्षेचा गुन्हा असेल."

    Show more Show less
    12 mins
  • # 1991 : माणुसकी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Mar 13 2026

    Send a text

    आज्जी चांगल्या घरच्या दिसत होत्या. अगदी गळून गेल्या होत्या थकव्याने. घाबरलेल्या स्थितीत होत्या. कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देता येत नव्हते. कसंबसं हे कळलं की कोणीतरी त्यांना बाइकने धक्का मारला आणि त्या पडल्या. ज्याची बाईक होती तो तसाच निघून गेला.
    त्या सतत एकच गोष्ट सांगत होत्या ,'मी माझ्या मुला सोबत आले, हरवले आणि माझ्या जवळ १०० रुपये होते ते सुद्धा चोरले.

    Show more Show less
    7 mins
  • # 1900 : वर्तुळाची शाळा' ले.श्री शंकर कऱ्हाडे ( कथन: मीनल भडसावळे )
    Mar 12 2026

    Send a text

    निसर्गावर प्रेम करणारा कवीमनाच्या मुलाची गोष्ट. त्याला शिस्त, संयम लावण्यासाठी एका रेषेत अडकवल. तिथे त्याची शाळा सुरू झाली. मग प्रतिभेला धुमारे फुटले. वडीलांनी पण साथ दिली. त्यातून एका निसर्गप्रिय महान व्यक्तीचा शिक्षण प्रवास सुरू झाला.

    Show more Show less
    6 mins
  • # 1989 : कालभैरवाची भेंडोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Mar 11 2026

    Send a text

    तुळजापुरात तुळजाभवानी भवानी मंदिर परिसरात काळभैरव आणि टोळभैरव या दोन क्षेत्रपाल देवतांची मंदिरे आहेत. वास्तविक तुळजापूर परिसरात भैरवाची अनेक ठाणे आहेत. त्यात कालभैरव, टोळ भैरव, उन्मत्त भैरव, रक्तभैरव, बटभैरव ही प्रमुख आहेत. इथे प्रचलित असलेल्या श्रद्धेनुसार कालभैरव हे देवस्थान तुळजाभवानी मंदिरापेक्षाही पूर्वीचे असून देवीच्या पूर्वीपासून कालभैरव इथे विराजमान आहेत.

    Show more Show less
    9 mins
  • # 1988 : स्मशानातील बाप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Mar 10 2026

    Send a text

    पुण्याच्या 'वैकुंठ स्मशानभूमीत' गेल्या तीस वर्षांपासून 'महादेव' हे मृतदेह जाळण्याचे काम करायचे. अंगावर एक मळकट धोतर, राखेने माखलेले शरीर आणि कपड्यांना येणारा जळक्या लाकडांचा व मांसाचा उग्र वास... हीच महादेव यांची ओळख होती. त्यांच्या या कामामुळे त्यांना समाजात कोणीही जवळ करत नसे.

    Show more Show less
    8 mins